Sunday, September 11, 2011

ओढ

या जन्मी जरी तुज, प्रथम पाहिले, शतजन्मांची ओळख आहे
तुला पहिले अन् मला वाटले की, जन्मांतरीची ही ओढ आहे || धृ ||

कधी सखी मी, अन् तू माझा, होतास प्रिय सखा
त्या मैत्रीची साथ ना आता, परि अंतरासी तुझी ओढ आहे || १ || तुला पहिले अन् ...

कधी मनगटी, तुझ्या बांधिला मी, नाजूक रेशीम धागा
त्या धाग्याचा बंध ना आता, परि अंतरासी तुझी ओढ आहे || २ || तुला पहिले अन् ...

कधी प्रिया मी, अन् तू माझा, होतास जिवलग प्रिया
त्या प्रीतीचा गंध ना आता, परि अंतरासी तुझी ओढ आहे || ३ || तुला पहिले अन् ...

कधी होवोनी, माय तुला मी, पाजिला अमृत पान्हा
त्या पान्ह्याची सय ना आता, परि अंतरासी तुझी ओढ आहे || ४ || तुला पहिले अन् ...

कुणी सांगावे किती जन्मांमध्ये, भेटलो तू अन् मी
कुणी सांगावे किती नात्यांमध्ये, फिरलो तू अन् मी
या जन्मी जरी नाते न काही, परि अंतरासी तुझी ओढ आहे || ५ || तुला पहिले अन् ...

No comments:

Post a Comment