वळण
वाट ही पुढची अंधुक होते, नकळत मन हे मागे जाते,
जीवनातल्या या वळणावर, मन हे माझे का व्याकुळते
मुठी मधल्या रेती सारखे, कित्येक क्षण ते निसटून गेले,
त्या क्षणांच्या आठवणीने, मन हे माझे का व्याकुळते.
वाळूचे ते घरकुल अपुले, लाटेसंगे वाहून गेले,
त्या घरट्याच्या आठवणीने, मन हे माझे का व्याकुळते.
तुझ्या प्रीतीचा गंध असा का वा॰यासंगे वाहून गेला,
त्या गंधाच्या आठवणीने, मन हे माझे का व्याकुळते.
हाता मधला हात असा का गर्दी मध्ये निसटून गेला,
त्या स्पर्शाच्या आठवणीने, मन हे माझे का व्याकुळते.
No comments:
Post a Comment