Saturday, October 15, 2011

तुझ्याचसाठी...

सोडून गेले शरीर जरी हे, विश्व सारे व्यापेन मी
तुझ्याचसाठी तुज सभोवती, बघ निरंतर राहेन मी

असूसशील तू मज पहाण्या, नजर उचलूनी वेध घे
तुझ्याचसाठी आसमंती, ता॰यांमधे राहेन मी

व्याकूळशील तू मज स्पर्शण्या, नयन मिटूनी स्तब्ध हो
तुझ्याचसाठी हलकेच तेव्हा, वा॰यामाधुनी वाहेन मी

शब्द माझा ऐकण्या तू, कासावीस होशील कधी
तुझ्याचसाठी गाज होऊनी, लाटांमधुनी बोलेन मी

नीज येता वाटेल तुजला, माझ्या कुशीची ओढ रे
तुझ्याचसाठी अंधार होउनी, वेढूनी तुजला घेईन मी

विरह माझा जाळेल जीवा, दीर्घ एकच श्वास घे
तुझ्याचसाठी प्राण होऊनी, हृदयी तुझिया स्पंदेन मी

No comments:

Post a Comment