Friday, July 22, 2011

प्रेम

प्रेम असते हळूवार भावना.
चोर पावलांनी येते, ह्दयात ठाण मांडून बसते.

प्रेम असतो नाजूक स्पर्श.
मोर-पिसाने गुदगुल्या करतो, गालांवर कळ्या खुलवतो.

प्रेम असते अनामिक हुरहूर.
विरहाच्या साथीने येते, प्रियकराची ओढ लावते.

प्रेम असतो गुलाबी रंग.
डोळ्यांमध्ये दडून बसतो, सारे विश्वच रंगून टाकतो.

प्रेम असते घट्ट मिठी.
आठवणींना आलिंगन देते, रेशीम धाग्यांनी बांधून ठेवते.

प्रेम असतो सुसाट वारा.
मी-तू पणाचे पाश तोडतो, क्षितिजाकडे वाहून नेतो.

प्रेम असते अनिवार आशा.
स्वप्नांची नक्षी कोरते, जगण्याला कारण देते,

जगण्याला कारण देते, जगण्याला कारण देते.

No comments:

Post a Comment