एकाच गोष्टी करिता चालला सायास आहे
मनास माझ्या लागलेला कवितेचा ध्यास आहे
डोक्यात माझ्या चालला विचारांचा खेळ आहे
शब्दांमधूनी भावनांचा उमटला निःश्वास आहे
गीत आहे चाल आहे सवे हृदयाचा ताल आहे
निसर्गाच्या मैफिली मध्रे होतो सुरांचा भास आहे
माणसाचा जन्म का उगीचच कुणाला मिळाला आहे?
प्रत्येकाचा निश्चित असा चालला इथे प्रवास आहे
गुरूंनी दाविलेली वाट माझ्या समोर आहे
ध्येय आता दूर नाही वाटतो विश्वास आहे

No comments:
Post a Comment